[br][br]Activity 1[br]– परिसरातील वस्तू उदा. वीट,[br]पुस्तक, डस्टर, खोके,[br]यांसारख्या वस्तू विद्यार्थ्यांना हाताळण्यास द्याव्यात व त्यांची मिती मोजण्यास सांगा.[br][br]Activity 2[br]– १ एकक मिती असलेले ठोकळे, फासे घ्या. ते जोडून विद्यार्थ्यांना विविध आकारांच्या इष्टिकाचिती बनविण्यास सांगा.[br][br]Activity 3[br]– एका खोक्यात एक काठी तिरपी ठेवण्यास सांगा. त्याचप्रमाणे वर्गातील टेबलच्या खालच्या पायाच्या टोकापासून वरच्या फळीच्या विरुद्ध टोकापर्यंत काठी तिरपी ठेवण्यास सांगा.[br]त्यावरून इष्टिकाचिती व घनाकृतीच्या कर्णाची संकल्पना स्पष्ट होईल.गणिती संवादाद्वारे या आकृतीच्या कर्णाची संख्या मोजण्यास सांगा.[br][br]Activity 4[br]– ‘घनफळ’ ही संकल्पना विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी ‘चतुर कावळा’ ही कथा कृतीने अथवा animation video ने दाखवा.[br][br]Activity 5[br]– रिकाम्या तेलाच्या डब्याच्या मिती विद्यार्थ्यांना ‘सेमी’मध्ये मोजण्यास सांगून, त्यात किती तेल साठविता येईल, हे शोधण्यास सांगावे.[br][br]Activity 6[br]– इष्टिकाचिती व घनाकृतीच्या वॉटरबॅगच्या मिती सेमीमध्ये मोजून तीत किती पाणी मावेल हे शोधण्यास सांगावे.[br][br]Activity 7[br]– मोजलेल्य द्रवाचे १ मिली = १ घन सेमी आणि १ ली[br]= १००० घन सेमी या पद्धतीने रूपांतरण करण्यास सांगावे.[br][br]