[br][br]महत्व मापन[br][br]शिक्षकमित्रहो![br]महत्व मापन म्हणजे,[br]‘मोठेपणाचे मापन.’ हा घटक अध्यापन करण्यापूर्वी खालील बाबी लक्षात घ्या.[br][br]विविध आकार, वस्तू इ.ची. विद्यार्थ्यांकडून यादी प्राप्त करून घ्या.[br][br]प्राप्त वस्तूंचे द्विमितीय, त्रिमितीय आकृत्यांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गीकरण करावयास सांगा.[br][br]द्विमिती व त्रिमिती चित्रपटांच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवून दोन्हींतील फरक ओळखण्यास सांगा.[br][br]निसर्गनिर्मित कोणतीही वस्तू कोपरा असलेली नाही, विद्यार्थ्यांना निरीक्षणातून तसेच गणिती संवादातून जवळच्या वस्तूंकडून परिसरातील वस्तूंकडे न्या.[br][br]विद्यार्थ्यांना गणिती संवादास प्रवृत्त करून ‘महत्व मापन’[br]या घटकाची ओळख करून द्या.[br][br]उदा.[br]१ रुपया व ५० पैसे मिळून एकूण किती रक्कम तयार होते, एकक एकाच पद्धतीत असावे, हे सांगण्याकरिता हे उदाहरण सोयीचे.[br][br]घटकाचे अध्यापन सुरू करण्याअगोदर हे करा.[br][br]महत्वमापन संकल्पना आकलन होण्यासाठी आवश्यक पूर्वज्ञान.[br][br]संज्ञा[br](त्रिज्या, व्यास, परीघ, जीवा,[br]केंद्रीय कोन,कंसाचे प्रकार, क्षेत्रफळे) बंदिस्त बहुभुजाकृतीसंबंधीच्या संज्ञा (लांबी, रुंदी,[br]उंची, कर्ण, शिरोबिंदू,[br]कडा, पृष्ठे, क्षेत्रफळ,[br]घनफळ, परिमिती) कोनमापन[br][br]खर्च[br]– अपूर्णांक संख्यांवरील क्रिया, एकाच एकक पद्धतीत रूपांतरण.[br][br]या संज्ञांचे आकलन होण्यासाठी[br]activity chart चा वापर करा. त्यामध्ये उद्देश, कृती, साहित्य,[br]सांख्यिकी, माहितीयुक्त तक्ता,[br]त्यातून मिळणारे. निष्कर्ष इ.चा समावेश करा.[br][br]विद्यार्थ्यांना परिसरात आढळणाऱ्या द्विमितीय व त्रिमितीय वस्तूंची क्षेत्रफळे काढण्यास सुचवा.[br][br]